Date 28/9/24

 

सहयोग प्रतिष्ठान,

सहयोग कॉलेज ठाणे तर्फे प्रभादेवी बीचवर स्वच्छता मोहीम


प्रभादेवी: आज सकाळी ८ वाजता सहयोग प्रतिष्ठान,

सहयोग कॉलेजतर्फे प्रभादेवी बीचवर स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आली होती. या मोहिमेत ३५ स्वयंसेवकांनी सहभाग घेतला, ज्यात NSS (राष्ट्रीय सेवा योजना) आणि ग्रीन क्लबचे स्वयंसेवक उत्साहाने सहभागी झाले.

समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता राखणे आणि पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी या स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले. स्वयंसेवकांनी प्लास्टिक, कचरा, आणि इतर घाणेरडे पदार्थ गोळा करून समुद्रकिनाऱ्याला स्वच्छ आणि सुंदर बनवण्याचे कार्य केले.

सहयोग कॉलेजच्या NSS आणि ग्रीन क्लब व इको आर्मी च्या नेतृत्वाखालील या उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले गेले आहे. "समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता राखणे म्हणजे पर्यावरणाचे संरक्षण करणे," असे संदेशही या मोहिमेद्वारे दिले गेले.